‘पक्षी वाचवू या’


   पक्षी हा प्रत्येकाला आवडतो.लहान असो किंवा मोठे असो पक्ष्यांचे आकर्षण सर्वांनाच असते.लहान मुलांना त्यांच्या जन्मापासून शिक्षणाची सुरुवात ही चिऊ,काऊच्या गोष्टीपासून आणि राघू मैनेच्या गाण्यापासून होते.मनुष्य प्राण्याचा अंत झाला तर कावळ्यासारखा पक्षी त्यावेळी मौल्यवान ठरतो.
          प्रत्येकाच्या मनात पक्ष्यांनबद्दल जिव्हाळा असतो.त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा असते,पण नेमके काय करायचे कुठे करायचे.याबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात.
कडक उन्हाळ्यात  पक्ष्यांची होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी काहीजण आपापल्या अंगणात प्रयत्न करतात.पण हेच प्रयत्न मोठी चळवळ बनू शकते.’पक्षी वाचवू या’ या उपक्रमातून.
       पर्यावरणातील अगदी लहान घटक पण महत्वपूर्ण असलेल्या छोट्या पक्ष्यांच्या जगण्यासाठी   या उन्हाळ्यातही राबविण्यात येत असलेल्या ‘पक्षी वाचवू या’ या उपक्रमात खारीचा वाटा उचलण्यासाठी पक्षीप्रेमी व संवेदनाशील असलेली जि.प.शाळा मोळेश्वरातील विद्यार्थी व शिक्षकांनी पुढाकार घेतला.
          घरातील श्रीखंड,आईस्क्रिमचे व पार्सलचे रिकामे डबे गोळा करून,त्यांना दो-या बांधून त्यात पक्ष्यांना खाऊ तांदूळ,ज्वारी,गहू व नाचणी तसेच पाणी ठेवण्यात आले.शाळेतून घरी जाताना बॉटल मध्ये पाणी घेऊन त्यात ओतण्यास सांगितले.मुलांचा  या गोष्टी करताना खूप उत्साह होता.त्यांनी अनेक कल्पनाचा ढीग रचला होता.
              सौ.जाधव मॕडम व सौ.बारंगळे मॕडमनी आखाडीमुरा येथे जाऊन पालकांना प्रबोधन केले.डोंगरावर राहणारी ही माणसे व मुले साधी भोळी ,निसर्गावर प्रेम करणारी व कष्टाळू आहेत. मे महिन्यात ही पाणी आणि चारा घालू.पक्षीप्रेम पालकांच्यामध्ये ही जागृत झाले.त्यांनी  डोंगरावरून खाली येताना या डब्यात पाणी आणि चारा न विसरता घालू असे अश्वासन दिले.
                 पक्ष्यांना वाचवा ते तुम्हाला भविष्यात वाचवतील.अशी साद घालत घराजवळ आपल्या आजूबाजूच्या परिसरात पक्ष्यांसाठी धान्य व पाणी ठेवण्याचे आवाहन सातत्याने केले.घराच्यापरिसरात  असलेला पक्ष्यांचा वावर म्हणजे किडे,कृमी नष्ट करण्यात मदत होते.अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून
समाज पक्ष्यां बाबत सजग होईल.पक्ष्यांना  वाचविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसेल त्यातून पर्यावरणाची साखळी अखंडीत राखता येऊ शकते. ‘पक्ष्यांना वाचवा’ सोशल मीडियावरील मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा प्रत्यक्षकृती महत्त्वाची.
       नवीन पिढीमध्ये पक्षीप्रेम,पर्यावरणस्नेही जागृतीसाठी असे छोटे- छोटे उपक्रम महत्त्वाचे ठरतात.पक्ष्यांचे  महत्त्व जाणल्यामुळे त्यांच्याकडून भविष्यात पक्ष्यांच्या  संरक्षणासाठी निश्चित काम होऊ शकेल.
     या उपक्रमाची दखल सकाळ व लोकमत पेपरवाल्यानी घेऊन पक्षीप्रेम समाजात जागृत केले.या आमच्या उपक्रमाला साथ दिल्याबद्दल धन्यवाद !
                        शब्दांकन
                       सौ.सविता बारंगळे
           जि.प.शाळा मोळेश्वर ता.जावली,जि.सातारा
                7350721277